श्री दुर्गा देवी आरती (दुर्गे दुर्गट भारी)

आदिशक्ती महिषासूरमर्दिनी दुर्गेची संकट निवारण करणारी आरती

सर्व आरत्या पहा

श्री दुर्गा देवी आरती (दुर्गे दुर्गट भारी)

दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी । वारीं वारीं जन्ममरणाते वारीं । हारीं पडलों आतां संकट निवारीं ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महिषासूरमर्दिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥ त्रिभुवनभुवनीं पाहतां तुजऐसें नाहीं । चारी श्रमले परंतु न बोलती कांहीं । साही विवाद करितां पडिलें प्रवाहीं । ते तूं भक्तांलागीं पावावी लवलाहीं ॥ २ ॥ जय देवी जय देवी जय महिषासूरमर्दिनी... प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशांपासुनि सोडीं तोडीं भवपाशा । अंबे तुजविण कोण पुरवील आशा । नरहरि तल्लीन झाला पदपंकजालेशा ॥ ३ ॥ जय देवी जय देवी जय महिषासूरमर्दिनी...
मराठी अर्थ: हे संकट हरण करणाऱ्या दुर्गे, या संसारात तुझ्याशिवाय कोणीही तारणहार नाही. तू अनाथांची माता आहेस, आम्हावर तुझी कृपा कर आणि आम्हांला या जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आणि संकटांतून सोडव.