श्री मारुती आरती (सत्राणे उड्डाणे)
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करिळ पूच्छ काळतांडव कोंदणीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।
सुरवर नर मुनि जन कोंदले गगनीं ॥ १ ॥
जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचेनी प्रसादें न भीं कृतांता ॥ धृ ॥
नेत्र तडाविले वासिला वदन ।
कवळीला सिंह सिंहनादें गगन ।
पुच्छ कळाळिलें कैलास भुवन ।
थरथरिला शेष थरारिलें मन ॥ २ ॥
जय देव जय देव जय हनुमंता...
अंजनिसुता वायुसुता कपिकुळटिळका ।
राक्षसमर्दन रामदूता महाबळदायका ।
दास रामाचा वाहे चरणीं पादुका ।
जय जय हो हनुमान सुखाचे नायका ॥ ३ ॥
जय देव जय देव जय हनुमंता...
मराठी अर्थ: अंजनीपुत्र आणि वायुपुत्र असलेल्या, राक्षस संहारक आणि रामदूत असणाऱ्या हे वीर हनुमंता, तुझा जयजयकार असो. तुझ्या कृपेने आम्हाला काळाचेही (मृत्यूचेही) भय राहत नाही. तुझ्या प्रचंड शक्तीने आणि हुंकाराने ब्रह्मांड थरथरले.