श्री विठ्ठल आरती (येई हो विठ्ठले माझे माऊलीये)

पंढरीच्या पांडुरंगाची भक्तांना मोक्ष देणारी आरती

सर्व आरत्या पहा

श्री विठ्ठल आरती (येई हो विठ्ठले माझे माऊलीये)

येई हो विठ्ठले माझे माउलीये । निढळावरी हात ठेवूनि वाट मी पाहे ॥ धृ ॥ आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती । दर्शनहेळामात्रे तयां मुक्ति होती । केशीराजा नामें भावे ओवाळिती ॥ १ ॥ येई हो विठ्ठले माझे माउलीये... बावीस खांब सुरेख सोन्याचा मखर । हिरे जडित मुकुट पीतांबर सुंदर । रुक्मिणीसहित उभा विटेवर । चरणकमले ओवाळूं भावें निरंतर ॥ २ ॥ येई हो विठ्ठले माझे माउलीये... तुका म्हणे विठोबा तुमचे चरण धरिलें । सर्व सुख या चरणीं मीं अनुभविलें । आता विसरू नको मज भक्तवत्सला । आरती ओवाळूं तुझ श्रीपंढरीनाथा ॥ ३ ॥ येई हो विठ्ठले माझे माउलीये...
मराठी अर्थ: हे विठ्ठल माऊली, तू धावून ये. आषाढी आणि कार्तिकी यात्रेला येणाऱ्या भक्तांना चंद्रभागेच्या स्नाने आणि तुझ्या केवळ दर्शनमात्रे मुक्ती मिळते.